औरंगाबाद : दुसऱ्या लाटेत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने अनेक रुग्णांना बेड मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनावर याचा मोठा ताण आला होता. त्यावेळी सौम्य लक्षणे असणाऱ्यांना होम आयसोलेशनची सशर्त परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार आत्तापर्यंत जिल्ह्यात २३ हजार बाधितांनी होम आयसोलेशन अंतर्गत घरीच उपचार घेतले आहेत. तर आजवर शहरात सुमारे ८५ हजार कोरोनाबाधित निघाले आहेत. सध्या होम आयसोलेशन बंद करण्यात आले आहे.
आजवर होम आयसोलेशनअंतर्गत उपचार घेणारे बरेच रुग्ण घराबाहेरही वावरत होते, हेही एक कारण संसर्गवाढीस कारणीभूत मानले जात आहे. औरंगाबाद शहरात कोरोनाच्या दुसर्या लाटेने मार्च आणि एप्रिल महिन्यात चांगलेच थैमान घातले होते. विशेष म्हणजे या काळात राज्यभरातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित आढळू लागल्याने सर्वत्र बेड्सची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने सौम्य लक्षणे असलेल्या व घरी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असेल अशा रुग्णांना होम आयसोलेशन अर्थातच घरीच उपचार घेण्यास परवानगी दिली.
शासन निर्देशानुसार औरंगाबाद पालिकेनेही रुग्णांकडून खासगी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन घरीच उपचार घेण्यास परवानी दिली. त्यानुसार मार्च आणि एप्रिल महिन्यात सुमारे चार हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्णांनी घरीच उपचार घेतले. पालिकेकडून प्राप्त आकडेवारीनुसार शहरात आजवर २२,९२९ बाधितांनी घरीच उपचार घैतले आहेत. यापैकी कोरोनाच्या दुसर्या लाटेत मार्च आणि एप्रिल महिन्यातील बाधितांची संख्या अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मात्र पालिकेच्या कोविड वॉर रूममधून मार्चमध्ये २,२४१ तर एप्रिलमध्ये १,१२९ रुग्णांनीच होम आयसोलेशनअंतर्गत उपचार घेतल्याचे सांगण्यात आले. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशनची सेवा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. घरीच उपचार घेणारे अनेक कोरोना रुग्ण घराबाहेर वावरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना कोविड सेंटर किंवा रुग्णालयात जाऊनच उपचार घ्यावे लागणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आता चंद्रपूर जिल्ह्यात होता येणार ‘फुल्ल टल्ली’, ठाकरे सरकारने दारूबंदी उठवली !
- आदर्श! कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी पालिकेचा मनोमित्र कक्ष सरसावला
- ‘मराठा आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा फक्त दिखावा’, अशोक चव्हाणांची टीका
- ‘शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे जिवलग मित्र होते; माझ्यात आणि राज मध्येही कॉमन पॉईंट !’
- अमेरिकन गुप्तहेर संस्था शोधून काढणार कोरोनाचा नेमका उगम कुठे झाला?


