औरंगाबाद : जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लसीकरण जाणीव जागृती रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. या रॅलीस शहागंज येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयापासून सुरुवात झाली तर चिश्तीया चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली.
औरंगाबाद जिल्ह्यात एक महिन्यापूर्वी लसीरकणारचे प्रमाण अल्प होते. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. याचाच भाग म्हणून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा यांनी विविध उपक्रम राबवून एक महिन्यात लसीरकणाचे प्रमाण ७८ % पर्यंत नेले आहे. यात सर्व प्रशासनाचे काम व नागरिकांच्या सहकार्य यामुळे हे यश साध्य झाले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यात आणखी २२ टक्के लसीकरणाचा टप्पा पूर्ण करुन १०० % लसीकरण व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर या रॅलीच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी देखील नागरिकांना लस घेण्यासाठी आवाहन केले. या लसीरकरण जाणीव जागृती रॅलीत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस अधीक्षक निमित गोयल, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे विविध अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी, नागरिक स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ प्रसिद्ध मोबाईल कंपनीच्या टॉवरचे साहित्य औरंगाबाद महापालिकेकडून जप्त
- आयसीसी क्रमवारीत भारतीय फलंदाजांची जबरदस्त झेप, अश्विनलाही झाला मोठा फायदा
- हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर नितीन गडकरींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘रविचंद्रन अश्विन अशीच गोलंदाजी करत राहिल्यास कुंबळेलाही मागे टाकेल’
- मावशी पद्मीनी कोल्हापूरेंनी केलेल्या कमेंटमुळे श्रध्दा कपूरची पोस्ट आली चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
