🕒 1 min read
औरंगाबाद :ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी लसीकरणावर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या डोसचे नियोजन काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. ६० वर्षांवरील नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याबरोबरच १५ वर्षावरील मुले तसेच आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्या लसीकरणासाठी पुढील वर्षी ३ जानेवारीपासून सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण(Sunil Chavan) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड टास्क फोर्सची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय(Aastik Kumar Pandey), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे(Nilesh Gatane, पोलीस अधीक्षक निमित गोयल(Nimit Goyal) उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या सूचनेनूसार जिल्ह्यात ३ जानेवारीपासून १५ वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनाने करावे. यामध्ये ‘हर घर दस्तक’ प्रमाणेच ‘हर स्कूल/कॉलेज दस्तक’ या उपक्रमांतून मुलांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लसीरकणासाठीचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले.
ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात विना मास्क फिरणाऱ्या एकूण ३२५ वाहनधारकांना परिवहन विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या असुन १ हजार १८० विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांचे फोटो महानगरपालिकेकडून कारवाईसाठी परिवहन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. या वाहन धारकाच्या वाहनांचे हस्तांतरणही बंद करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने नागरिकांनी गर्दी टाळावी म्हणून हॉटेल व रेस्टारंट क्षमतेच्या ५० टक्के तसेच लग्न समारंभ येथे १०९ व्यक्ती उपस्थित राहू शकतात याबाबत २५ डिसेंबर रोजी टास्क फोर्स समितीने जो निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे सर्व नियमावली जिल्ह्यासाठी लागू असणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- गुंडांनी भगवी वस्त्र धारण केल्यास त्यांना संत म्हणता येणार नाही; छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची टीका
- दक्षिण आफ्रिकेतील वनडे कर्णधारपदी केएल राहुलची होणार निवड?
- …तर राज्य सरकारने दोन दोन हात करण्याची हिंमत दाखवावी- भास्कर जाधव
- ‘मविआ’ने अल्टीमेटम देताच राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना बंद लिफाफ्यात पत्र
- “केएल राहुल सध्या जागतिक क्रिकेटमधील अष्टपैलू फलंदाज”


