Share

औरंगाबादेत शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळेच गुंठेवारीतील कायदा लागू-आ. अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी पडेगाव, मिटमिटा भागात घर बांधले. हे घर गुंठेवारीत नाही. गुंठेवारी कायद्याअंतर्गत २००० पर्यंतची घरे नियमित करावी. असा नियम होता परंतु इथल्या शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून २०१५ पर्यंतची घरे नियमित करावी अशी विनंती केली. आज राज्यातील ठाकरे सरकारने २०१५ नव्हे तर २०२० पर्यंतची घरे नियमित होतील. नागरिकांनी मनातील गैरसमज दूर करून आपली घरे गुंठेवारी कायद्यानुसार नियमित करून घ्यावीत असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले. पडेगाव, मिटमिटा प्रभागातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या पश्चिम शहरात वार्ड क्रमांक १५ मिटमिटा प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते गणेश रवीवाले यांचे घर ते सुहास ठोंबरे यांच्या घरापर्यंत तयार करण्यात येणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, गुंठेवारी कायद्यात आपली घरे नियमीत झाल्यास यात नागरिकांचाच फायदा आहे. आपल्या घराचे आपल्याला पीआर कार्ड मिळेल वेळप्रसंगी अडीअडचणीच्या वेळी या जागेवर आपल्याला कर्ज उपलब्ध होऊ शकते.

गुंठेवारीत घर नियमित करून घेत असताना या माध्यमातून जमा होणारा निधी हा आपल्याच भागातील सोयी-सुविधांसाठीच खर्च केला जातो. हे आपण लक्षात घेऊन वेळेच्या आत आपली घरे नियमित करून घ्यावी. यावेळी आमदार दानवे यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या दोन-तीन दिवसाच्या काळात गुंठेवारी कायद्यासंदर्भात या भागात शिबिर घेऊन आर्किटेक्चर, मनपा अधिकारी यांच्या सहकार्याने नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करून त्यांची घरे नियमित करून घेण्यास सहकार्य करावे असे आवाहन केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!