औरंगाबाद : जिल्ह्यात सध्या 422 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रविवारी दिवसभरात 44 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 36 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 46 हजार 243 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 44 हजार 606 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत 1 हजार 215 रुग्णांची मृत्यू झाला आहे. दरम्यान, नव्याने आढळलेल्या 44 रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 29 आणि ग्रामीण भागातील 15 रुग्णांची समावेश आहे.
दरम्यान, संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाची 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. औरंगाबाद शहरातही महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यामध्ये बन्सीलालनगर आणि सादातनगर या दोन केंद्रांवरील लसीकरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात येणार आहे. अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
- “करो या मरो” ; फ्रॅक्चर अंगठ्यानं मैदानात उतरण्यासाठी रवींद्र जडेजा सज्ज
- औरंगाबादेत 7 आरोग्य केंद्रांत लसीकरण, 2 केंद्रांत पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
- ‘क्रिकेट आपल्याला भेदभाव शिकवत नाही’; वर्णद्वेषी टीका प्रकरणावर तेंडूलकरने व्यक्त केली नाराजी
- टीम इंडिया कारणं शोधत आहे; ऑस्ट्रेलिया कॅप्टनची टीका
- औरंगाबादेत आणखी 20 बसेस धावणार, विद्यार्थ्यांना पासची सुविधा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

