ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघावर दुखापतीच सावट पसरल आहे. दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी ते प्रत्यक्ष मालिकेला सुरुवात झाल्यानंतरही टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशी दुखापतग्रस्त रिषभ पंत याने मैदानावर उतरून जी फटकेबाजी केली, त्यानं सामन्याचं चित्रच पालटले. पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाला त्यानं विजयाचे किरण दाखवले. दुर्दैवानं ९७ धावांवर तो बाद झाला. हनुमा विहारीचा फॉर्म पाहता, आता टीम इंडियाचं काही खरं नाही, असंच वाटतेय.
पण, ड्रेसिंग रुममधून एक सकारात्मक चित्र पाहायला मिळालं. अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यानं दुसऱ्या डावात गोलंदाजी करू न शकलेला रवींद्र जडेजा पॅड व ग्लोज घालून फलंदाजीला येण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळाला. सेट फलंदाज चेतेश्वर पुजारा ७७ धावांवर माघारी परतल्यानंतर जडेजा फलंदाजीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन फलंदाजी करणार असल्याचं समोर येत आहे.
सिडनी कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात जडेजाला फलंदाजीदरम्यान डाव्या अंगठ्याला मिशेल स्टार्कने टाकलेला बाऊंसर लागला होता. पण तरीही त्याने फलंदाजी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरला नाही. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले होते. जडेजाच्या ऐवजी मयंक अगरवालने दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण केले.
स्कॅननंतर जडेजाचा अंगठा फ्रॅक्चर असल्याचे निदान झाल्याने प्राप्त माहितीनुसार तो पुढील सहा आठवडे मैदानावर उपलब्ध राहु शकणार नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आणि पुढील चौथ्या कसोटीसाठी देखील रविंद्र जडेजा खेळणार नाही, हे जवळपास ठरल्यात जमा आहे. मात्र असे असले तरी रवींद्र जडेजा सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन फलंदाजी करणार आहे. भारतीय संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे रिषभ पंतही दुसऱ्या डावात फलंदाजी करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- टीम इंडिया कारणं शोधत आहे; ऑस्ट्रेलिया कॅप्टनची टीका
- ‘क्रिकेट आपल्याला भेदभाव शिकवत नाही’; वर्णद्वेषी टीका प्रकरणावर तेंडूलकरने व्यक्त केली नाराजी
- औरंगाबादेत 7 आरोग्य केंद्रांत लसीकरण, 2 केंद्रांत पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
- औरंगाबादेत आणखी 20 बसेस धावणार, विद्यार्थ्यांना पासची सुविधा
- …तर ओबीसी आरक्षणातच मराठा समाजाचा समावेश करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी


