Share

आंध्रप्रदेशात गूढ आजाराच थैमान; वैद्यकीय विशेषज्ञांसमोरही प्रश्नचिन्ह कायम…

Published On: 

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना आता आंध्र प्रदेशात एका गूढ आजाराने भितीचे वातावरण पसरले आहे. आता या आजाराच्या नियंत्रण आणि निर्मुलनासाठी सरकारने या आजाराच्या तपासणीसाठी वैद्यकीय विशेषज्ञांचे एक पथक आंध्र प्रदेशातील एलरू येथे पाठवले आहे. एलरूमध्येच हा आजार झाल्याचे प्रथम निष्पन्न झाले होते. यामुळे लोकांना मिरगी येणे, घबराट, मळमळ होणे आणि शरीरात तीव्र वेदना अशी लक्षणे दिसू लागली आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुमारे ५०० लोकांवर उपचार सुरू आहेत. यांपैकी अधिकतर लोक बरे झाले आहेत. मात्र एका आठवड्याच्या कालावधीत ४५ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून हा मृत्यू या रहस्यमय रोगामुळेच झाला असावा असे मानले जात आहे. एलरुच्या सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर ए. एस. राम यांनी माहिती देताना सांगितले की, ‘लोक घाबरलेली असल्याने अशी घटना घडल्याचे लोक सांगत आहेत. मात्र ते तसे नाही. अधिकांश रुग्णांमध्ये वास्तविक लक्षणे दिसलेली आहेत. मात्र, याचे नेमके कारण काय आहे हे आम्ही शोधू शकलेलो नाही.

काही अधिकारी कीटकनाशकात असलेल्या केमिकलमुळे हा आजार उद्भवला असल्याचे सांगत आहेत. तर, लोकांच्या म्हणण्यानुसार, कचरा आणि रानटी डुक्करांमुळे ही स्थिती निर्माण झालेली आहे.

या आजाराच्या लक्षणांमध्ये तीन ते पाच मिनिटांमध्ये लोकांना मिरगी येते. तसेच लोकांना उलटी, डोकेदुखी आणि पाठीत देखील दुखू लागते आणि त्यानंतर चक्कर येते. यानंतर लोक बेशुद्धही पडतात.आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्याशी नाते असणारे भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बातचित केली होती. एलुरुमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांसह विविध वयोगटातील व्यक्तींना या रहस्यमयी आजारपणाची लक्षणे दिसल्यानंतर रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

हा आजार नेमका काय आहे? आणि तो कोणत्या कारणानं फैलावला गेला? याबाबत मात्र डॉक्टारांसमोरही प्रश्नचिन्ह कायम आहे. या आजारात अनेक लोक अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळत आहेत. अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसत आहेत. या नवीन आजारानं डॉक्टरही चक्रावले आहेत.

या आजारानं पीडित एक रुग्ण विजयवाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. या ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. चक्कर आल्यानंतर या रुग्णाला अपस्माराचा झटका (फीट येणं) आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

शनिवारी एलुरुमध्ये चार वेगवेगळ्या भागांतून जवळपास ४५ रुग्णांमध्ये अजब लक्षणं आढळली होती. विशेष म्हणजे या रुग्णांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये ४६ मुलांचा तर ७० महिलांचा समावेश आहे. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४० हून अधिक रुग्णांवर उपचार यशस्वी ठरल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलंय. तर इतरांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचं त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवलंय.

या आजाराची माहिती मिळताच दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पथक एलुरूला दाखल झालंय. रुग्णांकडून विस्तृत माहिती घेत या आजाराची माहिती घेतली जातेय. स्थानिक आरोग्य आयुक्त कटमानेनी भास्कर हेदेखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एलुरूला दाखल झाले आहेत.

स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयवाडा आणि विशाखापट्टनमच्या लॅबमध्ये रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सेरेब्रल-स्पायनल फ्लुएड सॅम्पल रिपोर्ट आल्यानंतर या आजाराचा खुलासा होऊ शकेल. तज्ज्ञांकडून हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण तर दुधाद्वारे केमिकल पॉयजनिंग असा अनेक अँगलने चौकशी केली जातेय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!