पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर समाज माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येत्या २०२४ च्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले.
यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’देशातली कोणतीही आघाडी काँग्रेसला सोडून होऊ शकत नाही. २०२४ मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठीच गेल्या २ दिवसांपासून मी काम करत आहे. उत्तर प्रदेशात आम्ही लहान आहोत, मात्र निवडणूक नक्की लढवू. देश फार मोठा आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. २०२४ मध्ये एकपक्षीय सरकार जाऊन आघाडी सरकार सत्तेवर येईल. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची ताकद आहे,’
दरम्यान, पुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘एसटी कर्मचारी मृत्यू हा महत्त्वाचा विषय आहे. एसटी कर्मचाऱ्यांचीही वकिली करायला हवी. आर्यन खानला सोडायला मोठमोठे वकील लागले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मी वकील करेल. मुख्यमंत्री एसटी कर्मचारी प्रश्नावर गंभीर आहेत.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…नंतर ‘तेच’ माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी काम करत होते’, भुजबळांनी सांगितला जेलवारीचा अनुभव
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
- वळसे पाटील कोरोनावर मात करून लवकरच सेवेत रुजू व्हाल, याची खात्री- अजित पवार
- आर्यन खानच्या मदतीला जुही चावला आली धावून म्हणाली…
- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान मॅचदरम्यान फॅन्समध्ये तुफान हाणामारी; पाहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

