Share

शहर विकासावर खा इम्तियाज जलील यांची मनपा आयुक्तांशी चर्चा

Published On: 

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यानी आज औरंगाबाद महानगपालिका कार्यालयात आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासोबत औरंगाबाद शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहरातील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकास कामाविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच कोविड चा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने महानगर पालिका तर्फे करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतली.

या बैठकीमध्ये खासदार इम्तियाज जलील यानी औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा समस्येविषयी चर्चा करून सर्व वार्डातील नागरिकांना वेळेवर स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे सूचित केले. जेणे करून संचार बंदीच्या काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.

सलीम अली लेक हे शहराच्या पर्यटनाच्या दृष्टीने अती महत्वाचे असल्याने त्याचे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात यावे. विकास आराखड्यातील दमडी महल ते जालना रोड या शंभर फुटाच्या रस्त्याचे नवीन कामात बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना मोबदला यापूर्वीच मिळाला असल्याने लवकरच रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात यावे.

शहरातील मध्यभागी असलेल्या नेहरू भवन येथे अद्यावत नवीन बांधकाम सुरू करण्यात यावे. कट कट गेट येथे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम काही कारणास्तव थांबल्याने त्याची संपूर्ण माहिती घेवून नियमाप्रमाणे ते काम लवकर सुरू करण्यात यावे जेणे करून वाहतुकीची समस्या दूर होणार. प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यानी विकासाचे कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील याना आश्र्वासित केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!