औरंगाबाद- राज्यातील कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत आज आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली. मिशन बिगिन अगेन अंतर्गत ५ ऑक्टोबरपासून ५० टक्केपेक्षा जास्त नाही इतक्या क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत, त्यापूर्वीच दारू विक्रीही सुरू करण्यात आलेली आहे. मात्र हे सरकार सर्व धर्माचे धार्मिक स्थळे उघडायला तयार नाही. यासाठी अनेक संस्था संघटना यासाठी आंदोलन करत आहेत. याच मुद्द्यावरून आता एमआयएमचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका केली आहे.
बिअरबार उघडे ठेवून धार्मिक स्थळे बंद ठेवणारे आघाडी सरकार दारुड्यासारखे वागत असल्याची टीका जलील यांनी केली आहे. सर्व सामाजिक धार्मिक स्थळे सुरू केली जावीत अशी भूमिका घेणारे इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या मंदिराच्या प्रश्नावरुन शिवसेना राजकारणात आली, मोठी झाली, यश मिळालं. मात्र त्यांचं सरकार सत्तेत असताना त्यांना मात्र मंदिरांचा विसर पडला आहे का? असा रोखठोक प्रश्न देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- …म्हणून आज होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीकडे खासदार उदयनराजेंनी फिरवली पाठ
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा; निलेश राणेंचे राहुल गांधींना आव्हान
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर; शौविकला दिलासा नाहीच
- ‘१५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा ‘


