मुंबई- गेले काही दिवस भारत आणि चीनमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. ग्ल्वान खोऱ्यात झालेल्या घटनेमुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शांतीच्या गप्पा मारणाऱ्या चीनची आगळीक दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे.
भारत-चीन संबंधांवरून खासदार राहुल गांधी यांनी भाजापवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत, त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. काँग्रेसचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनला हाकललं असतं असा छातीठोकपणे दावा गांधी यांनी केला आहे.
हरयाणामधल्या सभेत बोलताना त्यांनी हा अजब दावा केला. यावेळी बोलताना गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी कायर आहेत. त्यांनी चीनला आपल्या देशाची जमीन बळकावण्याची मुभा दिली. १ हजार २०० चौरस किलोमीटर जमीन त्यांनी चीनला देऊन टाकली वरुन स्वतःला मोदी देशभक्त म्हणवतात.
#WATCH The coward PM says that no one has taken our land. Today, there is only one country in the world whose land has been taken by another country. And PM calls himself a 'deshbhakt'. If we were in power we would've thrown out China in less than 15 mins: Rahul Gandhi in Haryana pic.twitter.com/JarmXUMTFs
— ANI (@ANI) October 6, 2020
गांधी म्हणाले, चीनमध्ये एवढी हिंमतच नव्हती की आपल्या देशात पाऊलही ठेवतील. पण या घाबरट आणि कायर पंतप्रधानांमुळे चीनची एवढी हिंमत झाली. जगात भारत हा असा एकमेव देश आहे ज्यामध्ये चीनच्या सैन्यानं पाऊल ठेवलं आणि आपली १ हजार २०० चौरस किमी जमीन हडप केली. जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकलं असतं. चीनला १०० किमी मागे ढकललं असतं.
राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2020
दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या या दाव्यावार भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत तसेच राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देताना राणे यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे.राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटात चीनला बाहेर फेकले असत. चीन चं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा.
राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी रक्षामंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती पण एके अँटनीने हसत उत्तर दिलं, "आमच्या चर्चा सुरू आहे". चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?? https://t.co/e3MXz2pZZp
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 7, 2020
पुढे राणे म्हणाले, राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए के अँटनी रक्षामंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती पण एके अँटनीने हसत उत्तर दिलं, आमच्या चर्चा सुरू आहे. चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?? असा सवाल उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला १०० किमी मागे ढकललं असतं-राहुल गांधी
- सर्व सफाई कर्मचा-यांची कोव्हिड तपासणी करा; महापौरांनी दिले निर्देश
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- #Corona : नियम भंग करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द
- ‘१५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा ‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

