मुंबई – आज (७ ऑक्टोबर) मराठा समाजाच्या तसेच राजकीय वर्तुळात माथाडी भवनात होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कारण उदयनराजे आणि संभाजीराजे पहिल्या वेळेसच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण आज होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीसाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार,नवी मुंबईत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. या बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरवली आहे. ते लवकरच साताऱ्यात माराठा क्रांती मोर्चाची राजव्यापी बैठक घेणार आहे. साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीचे नेतृत्व स्वतः उदयनराजे भोसले करणार असल्याचे समजते आहे.
मराठा समाजाला आरक्षण कसे मिळवता येईल, सरकारवर कशा पद्धतीने दबाव टाकता येईल, या वेगवेगळ्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. उदयनराजे मराठा आरक्षणासाठी काय भूमिका मांडता याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण वातावरण तापले आहे. सरकारवर दबाव आण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीने 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला १०० किमी मागे ढकललं असतं-राहुल गांधी
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा; निलेश राणेंचे राहुल गांधींना आव्हान
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मंजूर; शौविकला दिलासा नाहीच
- ‘१५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा ‘


