मुंबई – देशभरात सध्या सुशांत सिंग राजपूत प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ड्रग्स खरेदी केल्याच्या आरोपाखाली रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती आणि इतर 18 आरोपींची आज न्यायालयीन कोठडी संपणार होती. मात्र, याप्रकरणी मंगळवारी सुनावणी करताना मुंबई कोर्टाने रिया आणि शौविक चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर, आज न्यायालयाने रियाला सशर्त जामीन मंजूर केला असून शौविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
Maharashtra: Bombay High Court grants bail to Rhea Chakraborty (in file pic), rejects bail plea of her brother Showik Chakraborty.
Narcotics Control Bureau had arrested them in connection with a drugs case related to #SushantSinghRajput death pic.twitter.com/FqhCS7UzGy
— ANI (@ANI) October 7, 2020
२८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केलं होतं. सुशांत सिंहच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले होते.
दरम्यान, रियाला 8 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. एनसीबीने तीन दिवस 15 तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक केली होती.
महत्वाच्या बातम्या :-
- जर आमचं सरकार असतं तर १५ मिनिटात चीनच्या सैन्याला १०० किमी मागे ढकललं असतं-राहुल गांधी
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घराच्या बाहेर काढून दाखवा; निलेश राणेंचे राहुल गांधींना आव्हान
- मराठा आरक्षण : युवकाला शिव्या देत दमदाटी करणाऱ्या सत्तारांना अटक करा
- #Corona : नियम भंग करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द
- ‘१५ मिनिटात चीनच्या सैन्याला बाहेर फेकण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा इतिहास कच्चा ‘
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

