🕒 1 min read
नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत सुधरू शकलेले नाहीत. सीमेपलीकडून वारंवार होत असलेल्या घुसखोरीच्या कारवाया आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन यामुळे दोन्ही देशांमधले संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. मात्र, आता या सगळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS ची विचारसरणी आडवी आल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
दक्षिण-मध्य आशिया परिषदेसाठी इम्रान खान सध्या उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना इम्रान खान यांनी दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांचं खापर आरएसएसवर फोडलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाचवेळी होऊ शकते का ? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना खान यांनी संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
#WATCH Pakistan PM Imran Khan answers ANI question, 'can talks and terror go hand in hand?'. Later he evades the question on whether Pakistan is controlling the Taliban.
Khan is participating in the Central-South Asia conference, in Tashkent, Uzbekistan pic.twitter.com/TYvDO8qTxk
— ANI (@ANI) July 16, 2021
‘आम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहोत की, भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध तयार व्हावेत. दोन्ही देश सभ्य शेजाऱ्यासारखे राहावेत. पण, करणार काय ? RSS ची विचारधारा आडवी येते…’ यानंतर त्यांना तालिबानवर तुमचा कंट्रोल नाही का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर इम्रान यांनी उत्तर देणं टाळलं.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- ‘मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही’
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
