मुंबई : अल्लू अर्जुनच्या “पुष्पा” चित्रपटाचा क्रेझ अधिकच वाढताना दिसत. क्रिकेट जगतावर याचा जास्त प्रभाव दिसत आहे. डेव्हिड वॉर्नरने सुरु केलेल्या पुष्पाच्या या ट्रेण्डने इतरही क्रिकेटर्सनी फॉलो केले आहे. नुकताच अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज रशीद खानने पुष्पाचे डायलॉग म्हणताना व्हिडीओ टाकला आहे. जो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
रशीद खानने त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ टाकला आहे. ज्यात तो अल्लू अर्जुन सारखी ऍक्टिंग करत ” पुष्पा सुनके फ्लॉवर समझे क्या? फायर है मैं!” हा डायलॉग मारत आहे. त्याच्या या व्हिडीओ खाली अनेक जणांनी कमेंट केल्या आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आणि राशिदचा सनरायझर्स हैद्राबाद संघातला सहकारी डेव्हिड वॉर्नर आहे. ” हा हा माझी कॉपी करणे बंद कर” अशी कमेंट वॉर्नरने केली आहे.
Rashid khan ????????#Pushpa @alluarjun pic.twitter.com/CUSnzyIr4d
— ????Balu Bunny???? (@BALU_BUNNY_AA) January 28, 2022
रशीद खान आधी सुरेश रैना, हार्दिक पंड्या, ड्वेन ब्राव्हो यांनीही पुष्पा या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर डान्स केला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मीका यांच्या पुष्पाने सगळ्यांनाच वेड लावलेले दिसत आहे. त्यांचा फिवर प्रत्येक क्षेत्राला चढला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “सत्ता टिकवण्यासाठी आणि काँग्रेसचे लांगूलचालन करण्यासाठी शिवसेना भूमिका घेत नाही”, ‘त्या’ प्रकरणावरून दरेकरांची टीका
- “व्यापाऱ्यांनी त्यांच्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये मद्य विक्री करू नये”, आठवलेंचे आवाहन
- “भाजपमधून बरेच लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार”; नवाब मलिकांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- सुपरमार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी मविआने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे- देवेंद्र फडणवीस
- दक्षिण आफ्रिकेच्या “बेबी एबी”ची आयपीएलमध्ये “या” संघाकडून खेळण्याची इच्छा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

