कोल्हापूर: मालेगाव येथील २७ काँग्रेस नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाच शिवाय यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एकमेकांचे कार्यकर्ते इतर पक्षात जात असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP State President Chandrakant Patil) यांनी टीका केली होती. यावरच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (State Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात कार्यकर्त्यांची ये-जा सुरूच असते. ताटात काय आणि वाटीत काय असा हा प्रकार आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी इतकं हळवं होण्याची गरज नाही, असा टोला मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
दरम्यान शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाला राष्ट्रवादी पक्ष खाऊन टाकणार आहे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते, यावरच हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. यावेळी मास्कमुक्त महाराष्ट्र याबाबत हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘अमेरिका आणि फ्रान्स हे देश मास्क मुक्त झाले आहेत. आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे यावर चर्चा झाली. परंतु, टास्क फोर्स बरोबर चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाईल. सध्यातरी हा निर्णय लगेच होईल असे वाटत नाही.’
महत्वाच्या बातम्या:
- “सत्ता टिकवण्यासाठी आणि काँग्रेसचे लांगूलचालन करण्यासाठी शिवसेना भूमिका घेत नाही”, ‘त्या’ प्रकरणावरून दरेकरांची टीका
- “व्यापाऱ्यांनी त्यांच्या किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये मद्य विक्री करू नये”, आठवलेंचे आवाहन
- “भाजपमधून बरेच लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार”; नवाब मलिकांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार
- सुपरमार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी मविआने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे- देवेंद्र फडणवीस
- दक्षिण आफ्रिकेच्या “बेबी एबी”ची आयपीएलमध्ये “या” संघाकडून खेळण्याची इच्छा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

