Share

“ठाकरे सरकारने पोलीस बळाचा चुकीचा वापर करत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारने पोलीस बळाचा चुकीचा वापर करत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली असल्याचे म्हटले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्या भ्रष्टाचारांच्या मालिका संपता संपत नाहीत. देशोधडीला लागलेल्या देशमुखांवर पुन्हा एकदा करण्यात आलेले आरोप हे त्यांनी भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराची सीमा कितपत गाठली होती, हे दाखवून देतात. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अनिल देशमुखांवर पोलीस आणि विशिष्ट पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा आरोप केला आहे. जो माणूस १०० कोटींची वसुली करू शकतो, तो काहीही करू शकतो, यात शंकाच नाही.

त्यामुळे ठाकरे सरकारने पोलीस बळाचा चुकीचा वापर करत राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र पोलिसांची बदनामीही केली. त्यामुळे या सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांचं पितळ उघडं पडत आहे. आपल्या पदाचा गैरवापर करून बेहिशेब संपत्ती गोळा करणाऱ्या देशमुखांना आणि अशा सर्व मंत्र्यांना चपराक बसणं गरजेचं आहे.असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!