🕒 1 min read
नांदेड : देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे आव्हान काँग्रेसने स्वीकारले आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे आणि जितेश अंतारपूरकर यांच्यात ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे
तत्पूर्वी, सोमवारी भाजपने देगलूर येथे मेळावा घेतला होता. यावेळी टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंढरपूरनंतर देगलूरमध्येही क्रांती होणार असा विश्वास व्यक्त केला होता. यावर काँग्रेस नेते तथा मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आज कुंडलवाडी येथे महाविकास आघाडीची पहिली जाहीर सभा झाली. यावेळी ते म्हणाले की, ‘भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते, नेहमी-नेहमी नाही, हे भाजपने लक्षात ठेवावे’ असा टोला पालकमंत्री चव्हाण यांनी लगावला आहे.
भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार!
पण लॉटरी एकदाच लागते; नेहमी-नेहमी नाही, हे भाजपने लक्षात ठेवावं. pic.twitter.com/37UWkHqw2w— Ashok Chavan (@AshokChavan1958) October 5, 2021
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर होत असलेली विधानसभेची ही दुसरी पोटनिवडणूक आहे. याआधी झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव केला होता. देगलूर बिलोलीची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला दुसरा धक्का देण्याची जोरदार तयारी भाजपनं केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना गळाला लावून भाजपनं त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. केवळ उमेदवारी जाहीर करून भाजप थांबलेला नाही, तर प्रचाराची राळही उडवून दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘खोटे बोल पण रेटून बोल’ देवेंद्र फडणवीसांच्या लातूर दौऱ्यावर काँग्रेसची टीका
- युपी सरकारच्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज- संजय राऊत
- शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणाऱ्यांना फासावर लटकवा; सदाभाऊ खोत यांची मागणी
- अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
- ‘शिवसेना भाजपबरोबर ठरलेले लग्न मोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पळून गेली अन्..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
