मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड मंत्रिपदावरून पायउतार झालेत. मात्र, तरीही हे प्रकरण त्यांना शांत बसू देत नाहीये. अशीच अवस्था सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची आहे. एका महिलेने त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले. मात्र, काही दिवसांतच तिने ही तक्रार मागे घेतली. पंरतू त्यानंतर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या महिलेने म्हणजेच करुणा मुंडे यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. माझ्या मुलांना धनंजय यांनी त्यांच्या बंगल्यात कैद केल्याची तक्रार करुणा यांनी पोलिसांकडे केली. त्यामुळे काही दिवस यांचे लिव्ह इनचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले.
आता विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. यावेळी विधानपरिषदेच्या सभागृहात सुरेश धस यांनी संजय राठोड यांचे नाव घेता पूजा चव्हाण प्रकरणावरून सरकारवर टीका केली. धस म्हणाले, मी लहानपणी शोले चित्रपट बघितला होता. त्या पिक्चरमधील गब्बर पण ठाकूरला सापडला. पण या राज्यातला गबरू कोण आहे? या सरकारला गबरू कसा सापडत नाही. असा कसा गबरू आहे. तो आम्ही केवळ किल्पवरच ऐकतोय. गबरूशेठ प्रकरणाने खूप चुकीचा पायंडा पाडलेला आहे. एखाद्या समाजाचा आधार घेऊन आमच्या मागे समाज आहे म्हणून काही पण करायचं का?
यानंतर ते म्हणाले, ”या सरकारला खरं तर नोबेल पुरस्कारच द्यायला हवाय. आम्ही पोहोरादेवी, सेवालाल महाराज, रामराव महाराजांना आम्ही पण मानतो, पण तुम्हाला विनंती करतो की असे गबरू शेठ पुढे होऊ देऊ नये. आधीच आमच्या बीड जिल्ह्याचं नाव प्रत्येक क्षेत्रात येत आहे. इंटरनॅशनल स्तरावर नाव चर्चीले जात आहे.” धस बोलत असताना सभागृहात मध्येच कुणीतरी धनंजय मुंडे यांचे नाव उच्चारतो. त्यांचे बोलणे टोकत धस म्हणाले की, ”धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर मी बोलणार नाही. ते प्रकरण आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे.”
सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत वाढलेले म्हणून या दोघांना ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी या दोन्ही नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात सुरेश धस पंकजा मुंडे यांच्यामुळे भाजपमध्ये वापस आले. सध्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये असले तरीही धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची ‘मैत्री’ कायम आहे. त्यामुळे धनंजय यांच्या आरोपानंतर सुरेश धस यांनी त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, विधान परिषदेत हा मुद्दा निघाल्याने धस यांच्या तोंडातून खरे काय ते निघून गेल्याची चर्चा बीड जिल्ह्यात सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गब्बर सापडला, सरकारला गबरू कसा सापडत नाही?’
- लक्षवेधक! शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी विधीमंडळात आंदोलन
- धनंजय मुंडेंना धक्का, ‘या’ ठिकाणी नमिता मुंदडा यांचे पुन्हा एकदा वर्चस्व
- एसटी अधिकाऱ्याला शिवीगाळ; ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षांना ठोकल्या बेड्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा


