Share

उन्हाळ्यापूर्वीच सिडको-हडकोत पाण्याचा ठणठणाट

Published On: 

औरंंगाबाद : उन्हाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावरच शहराच्या विविध भागातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सिडको-हडको भागाला वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने या भागात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे.

बुधवारी (दि.३) सिडको-हडकोत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.
नवीन औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी जलाशय आणि जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारा हर्सूल तलाव यंदाच्या वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे तुडुंब भरून वाहत आहे.

असे असतांना देखील मनपाकडून शहरासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन केले जात नसल्यामुळे शहरातील अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सिडको-हडकोतील नवनाथनगर, मयूरपार्वâ, वानखेडेनगर, भारतमाता नगर या भागात सुरळीतपणे पाणी पुरवठा होत नसल्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!