औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबरच विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या नऊ दिवसांत अशा १२०५ व्यक्तींवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली. याच नऊ दिवसांत शहरात १,९४१ कोरोनाबाधित नव्याने दाखल झाले. त्यामुळे मास्क घातला नाही तर, संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मास्क न वापरणारा, आरोग्याची काळजी न घेणाऱ्या या बेजबाबदार गटामुळेच शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
कोरोनापासून बचावासाठी मास्क हा एकमेव पर्याय असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित वावर आणि सॅनिटायझरचा वापरही आवश्यक आहे. असे शासकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून वारंवार सांगितले जात आहे, पण याकडे काही व्यक्ती दुर्लक्ष करताना दिसून येतात. विनामास्क फिरण्याकडे त्यांचा कल दिसून येतो.
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून पालिकेतर्फे ही कारवाई केली जात आहे. आता कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर अधिक कठोरपणे कारवाई करण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.
२० ते २८ फेब्रुवारी या नऊ दिवसांच्या काळात तब्बल १२०५ नागरिकांवर मास्क न घातल्याबद्दल प्रत्येकी पाचशे रुपये या प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि सुमारे पाच लाख ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नऊ दिवसांमध्ये दोन दिवसांचा अपवाद वगळता अन्य सात दिवस विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या शंभरच्या पुढेच आहे. याच काळात १,९४१ नवीन कोरोनाबाधित आढळले. बाधितांची संख्या वाढू द्यायची नसेल तर मास्क घालणे गरजेचेच आहे असे मत व्यक्त केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे औरंगाबादेत गर्दीच्या ठिकाणी लॉकडाऊन? वाचा सत्य काय आहे..
- माजी नगरसेवकाच्या पत्नीची विष प्राशन करून आत्महत्या
- मी फक्त पूजाला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप मोबाईलबद्दल मला कहीही माहित नाही; भाजप नगरसेवकाचा दावा
- मोठी बातमी : अखेर संजय राठोड यांची गच्छंती; राज्यपालांनी राजीनामा केला मंजूर
- ‘गब्बर सापडला, सरकारला गबरू कसा सापडत नाही?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

