उस्मानाबाद : केंद्र सरकारने तामिळनाडू सरकारचे आरक्षण कायम राहण्यासाठी सुप्रीम कोर्टास शपथपत्र दिले आहे. तसेच शपथपत्र मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी देण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेच्या शून्य प्रहरात केली.
खासदार ओमराजे यांनी म्हटले की, मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड त्याग केला. अनेकांनी आयुष्याची होळी करुन बलिदान दिले. अनेक विद्यार्थ्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केल्या. अनेक समित्यांच्या व मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या अभ्यासानंतर २०१८ साली महाराष्ट्र शासनाने सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले होते. सदरील आरक्षणावर आलेली आव्हाने, याचिका व आक्षेपांना फेटाळून गायकवाड समितीच्या अहवालानुसार उच्च न्यायालयाने देखील मराठा आरक्षण मान्य केले.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज बांधवावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. तमिळनाडू राज्यातील आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी ज्याप्रमाणे केंद्र सरकारने शपथपत्र देऊन आरक्षणाचा गंभीर प्रश्न सोडवला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील केंद्र सरकारने माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे आरक्षणाबाबतचे शपथपत्र द्यावे व मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ह्रदयद्रावक घटना! आईची मुलासह आत्महत्या, प्राण गेल्यानंतरही चिमुकल्यावर घट्ट पकड
- धक्कादायक! बसमध्ये ८१ प्रवासी; जिंतूर येथील एस.टी. आगारात कोरोना नियम धाब्यावर
- यांच्यावर कारवाई होणार का? कोरोना तपासणी करणारे कर्मचारीच मास्कविना
- महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, मध्यप्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय…
- इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पृथ्वीला संधी नाहीच
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
