Share

ह्रदयद्रावक घटना! आईची मुलासह आत्महत्या, प्राण गेल्यानंतरही चिमुकल्यावर घट्ट पकड

Published On: 

बुलडाणा : बुलडाणा तालुक्यात एक मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. हतेडी बु. गावातील एका विवाहित महिलेने आपल्या सहा वर्षाच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार काल, गुरुवारी उघडकीस आला. त्यापूर्वी दोन दिवसांपासून ही महिला मुलासह बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, जीव गेल्यानंतरही आई आपल्या मुलाला घट्ट पकडून असल्याचे चित्र पाहून उपस्थितांचे मन हेलावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रुपाली हरिदास चव्हाण (२५) आणि मुलगा समर्थ (६) अशी मृतांची नावे आहेत. हतेडी येथील गट क्रमांक २४ मधील सीताराम चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत एका महिलेसह बालकाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याची माहिती गावातील काही नागरिकांनी सीताराम चव्हाण यांना दिली. त्यांनी पोलिी पाटील यांना या घटनेची माहिती देताच ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

मृत महिला मुलासह १७ मार्चला घरून निघून गेली होती. ते परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, दोघेही सापडले नाहीत. १८ मार्चला दोघांचे मृतदेह विहिरीत आढळले. दरम्यान, या दोघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!