🕒 1 min read
उत्तर कोरिया : उत्तर कोरियाचा ३७ वर्षीय हुकूमशहा किम जोंग उन यांनी प्राण्यांविरूद्ध युद्ध पुकारले आहे. त्यांनी अभूतपूर्व आदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी उत्तर कोरियातील मांजर, कबूतर मारण्याचे आदेश दिले आहेत. चीनकडून या प्राण्यांनी सीमेमार्फत उत्तर कोरियामध्ये धोकादायक विषाणू आणल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाला लगाम घालण्याच्या या आदेशात भटक्या मांजरांना मारणे आणि चीनच्या सीमेतून देशात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही पक्षाला गोळी घालणे, याचा समाविष्ट आहे. नुकतेच सीमेजवळील हेसन येथे एका कुटुंबाला शिक्षा देण्यात आली होती. आपल्या घरात मांजर पाळण्यासाठी त्यांना 20 दिवस आयसोलेशन केंद्रात ठेवण्यात आले होते. सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत.
यापूर्वी एक असेही वृत्त आले होते, की उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने एका अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर देशातील सर्व प्रमुख रुग्णालयांत चिनी औषधांच्या वापरावर बंदी घातली होती. दरम्यान, कोरोना लसचा अधिक साठा करण्यासाठी काही देशांवर उत्तर कोरियाने जोरदार टीका केली आहे, कोरीयन प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेला जगभरातील कोरोना लसीचे निष्पक्ष वितरण करण्यास मदत करण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोकणाचा कॅलिफोर्निया व्हावा ही पवारसाहेबांची इच्छा – अजित पवार
- आरक्षणावरून संभाजीराजेंनंतर भाजपचे आणखी एक खासदार आक्रमक
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘काँग्रेसचे मंत्री लाचार झालेत, ते काका-पुतण्यांसमोर माना डोलावतात’
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
