Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे जनतेला महत्वाचे आवाहन !

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात दिवसेंदिवस नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये मोठी भर पडत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने देखील उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती १४ एप्रिल रोजी आहे. जयंतीच्या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ई-बैठक पार पडली आहे. यावेळी जयंती समन्वय समितीने ब्रेक द चेन ला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यंदा जयंती उत्सवाचे स्मारकांतून थेट प्रक्षेपण होणार आहे.

या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्साहात आणि प्रथा-परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरी केली जावी. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुयायांनी व जनतेने गर्दी न करता, घरा-घरातूनच त्यांना अभिवादन करावे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचे पालन केले जाईल, ‘ असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!