Share

Chitra wagh : “सर्वज्ञानी संपादकांनी या झमेल्यात पडू नये, कर्माची फळे…” ; चित्रा वाघ यांचा राऊतांना सल्ला

Published On: 

मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलताना देवेंद्र फडणवीसांना या फंदात पडू नका असा सल्ला दिला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.

“वड्याचं तेल वांग्यावर काढण्याच्या झमेल्यात सर्वज्ञानी संपादकांनी पडू नये, कर्माची फळे भोगताना “सुख मानण्यावर आहे” या मुख्यमंत्र्यांच्या उपदेशाचे स्मरण करावे आणि आनंदात रहावे”, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

 

नेमकं संजय राऊत काय म्हणाले ? 

“आज हजारो शिवसैनिक आमच्या पाठिशी उभे आहेत. पैसा, दहशतवादाच्या जीवावर आम्हाला कोणी विकत घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतो की तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झालं ना ते आता सायंकाळी होईल, भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. तुमच्या नेतृत्वाला धक्का बसेल. ते विरोधी पक्षनेते आहेत. जरी ते आमचे राजकीय विरोधक असले तरी तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे”. असा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!