मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक शिवसेना नेत्यांनी सेनेशी बंड पुकारत आसामला मुक्काम ठोकला आहे. माझ्यासोबत ४० आमदार आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहेत, सोबत नवीन गट स्थापन करणार अशी चर्चा सुरु असताना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला सामोरे जात एकनाथ शिंदे यांनी गटाचे नाव ठरविले असल्याचे समोर येत आहे.
“शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा,” असं आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काल केले होते. त्यानंतर आज शिंदे गटाचं नाव समोर येत आहे. शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असं नाव शिंदे गटानं निश्चित केलं असल्याचे सूत्रांनुसार कळत आहे. याबद्दलची घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पाश्वर्भूमीवरून शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष पेटण्याची दाट शक्यता देखील आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी हिमंत असेल तर शिवसेना आणि ठाकरे यांचे नाव न घेता उभे राहून दाखवा. माझा फोटो न दाखवता लोकांमध्ये जा. मेलो तरी पण शिवसेना सोडणार नाही असे म्हणणाऱ्यांनी आज शिवसेना सोडली. शिवसेना फोडण्याचे पाप बंडखोरांनी केले आहे. ज्यांना मला मुख्यमंत्री म्हणून बघायचे नाही, त्यांच्या महत्त्वाकांक्षा राक्षसी आहेत. जे आम्हाला सोडून गेले त्यांची मी काय काळजी करू?,असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी काल उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या –


