Share

‘महाराष्ट्र देशा’चा इम्पॅक्ट! अखेर मोडकळीस आलेल्या मेहमूद दरवाजाच्या संवर्धनासाठी निविदा प्रसिद्ध होणार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पानचक्की जवळील ऐतिहासिक दरवाजाची एक बाजू निखळल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. अनेक वर्षांपासून या दरवाजाची दुरुस्ती करण्याची मागणी इतिहासप्रेमी नागरिकांमधून होत आहे. स्मार्ट सिटी मध्ये या दरवाजाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र अजून यासंबंधी कुठलीही प्रक्रिया झालेली नव्हती. याबाबत ‘महाराष्ट्र देशा’ने वृत्त प्रसिद्ध करत या प्रकरणी मनपा आयुक्तांनी लक्ष घालण्यासाठी सतत आग्रही भूमिका मांडली होती. अखेर स्मार्ट प्रशासनाला ‘महाराष्ट्र देशा’ च्या बातमीनंतर जाग आली आहे. सोमवारी (दि.१९) औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे ऐतिहासिक मेहमूद गेटच्या संवर्धनासाठी येत्या दहा दिवसांत सुधारित अंदाजपत्रका सोबत नव्याने निविदा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) चे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगरपालिका चा संरक्षणात असलेल्या शहरातील ९ ऐतिहासिक दरवाजांचे संवर्धनाचे काम होत आहे. यात रोशन गेट, कटकट गेट, पैठण गेट, खिजरी गेट, काला गेट, नौबत गेट, जाफर गेट, बरपुल्ला गेट आणि मेहमूद गेटचा देखील समावेश आहे. या गेटच्या संवर्धनाचे कार्य ८० ते ९० टक्के पूर्ण झालेले आहे. मात्र मेहमूद गेटच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्या मुळे त्याचे काम सुरू होऊ शकले नव्हते.

आणि मध्यंतरी गेटची परिस्थिती अजून खराब झाली. मागच्या आठवड्यात औरंगाबाद स्मार्ट सिटीने तज्ञांकडून मेहमूद गेटचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घेतले. याबाबत औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी म्हणाल्या की, स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झालेला आहे. आणि त्यानुसार सुधारित अंदाजपत्रक तयार करून पुन्हा एकदा मेहमूद गेटची निविदा येत्या दहा दिवसांत प्रसारित करण्यात येईल.

पूर्वी या कामासाठी ५६ लाखांचे अंदाज पत्रक तयार केले गेले होते. शुक्रवारी झालेल्या एएससीडीसीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतर प्रकल्पांबरोबर मेहमूद गेटची निविदा प्रसिद्ध करण्यासाठी मंजुरी मिळाली होती. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!