Share

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली बिल्डा येथील कोव्हिड सेंटरची पाहणी 

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांचा शुक्रवारी दि.२३ पुâलंब्री तालुक्याचा दौरा केला. यामध्ये त्यांनी बिल्डा शिवारामधील शासकीय कोव्हिड केअर सेंटर आणि सद्गुरु हॉस्पिटलच्या खाजगी कोव्हिड हेल्थ सेंटरला भेटी दिल्या. यावेळी त्यांनी सेंटरमधील रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करून कामाची पाहणी करत कामाबाबत समाधान व्यक्त केले.

सद्गुरु हॉस्पिटल, बिल्डा येथील खाजगी कोव्हिड केअर सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेची देखील त्यांनी पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच सेंटरला स्वतःचा ऑक्सिजन प्लांट लवकर सुरू करण्यासही सांगितले. यानंतर गोंदवलेंनी प्राथमिक आरोग्य केंद्र, गणोरी येथे लसीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली आणि स्वत: कोव्हिड प्रतिबंधक लस घेऊन, पात्र नागरिकांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.

दरम्यान, यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गणोरी येथे कोव्हिड तपासणी टेस्टिंगचे काम वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.विजय वाघ, गट विकास अधिकारी डॉ.अशोक दांडगे, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.प्रसन्न भाले, नोडल अधिकारी डॉ.सतीश साबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.रविराज पवार डॉ.सुरेश ताठे, डॉ.सिकंदर शेख, डॉ.विजय काथार, गंगाधर मुंढे, बालानाथ बोर्डे, विजय जाधव, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!