औरंगाबाद : सिमेंट आणि स्टीलच्या किमतीत वाढ झाल्याने नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदार कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तीनशे कोटी रुपये वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. तसेच काम करण्यास इच्छुक नसाल तर सांगा, आम्ही दुसऱ्या क्रमाकांवरील कंपनीला हे कंत्राट देऊ, अशा इशाराही देण्यात आला. त्यानंतर आता जीबीपीआर कंपनीने बँक गॅरंटी भरण्याची तयारी दर्शविली आहे. सदर योजनेचा शिवसेनेकडून नुसताच बोभाटा करण्यात आला मात्र अजूनही काम सुरू झालेले नाही.
दोन दिवसांत बँक गॅरंटीची रक्कम जमा होऊन लगेचच योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात येतील, असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १२ डिसेंबर रोजी नवीन पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. हैदराबाद येथील जीबीपीआर कंपनीने बँक ग्यारंटी भरण्याआधी आणि कंपनीला कार्यारंभ आदेश देण्याआधीच घाईघाईत हे भूमिपूजन उरकण्यात आले.
आतापर्यंत कार्यारंभ आदेश दिले गेले नाहीत. त्यातच सिमेंट आणि स्टीलच्या दरात विक्रमी वाढ झाल्याने ठेकेदार कंपनीने निविदेत भरलेल्या दरापेक्षा तीनशे कोटी रुपये वाढवून द्या, अशी मागणी केली. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे योजनेचे काम रखडण्याची भीती व्यक्त होत होती. परंतु आता ही कंपनी काम करण्यास तयार झाली असून ती दोन दिवसांत बँक गॅरंटीच्या रकमेचा भरणा करणार असून त्यानंतर लगेचच कार्यारंभ आदेश दिले जातील, असा दावा जीवन प्राधिकरणकडून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्याृ
- एलआयसीच्या खासगीकरणामध्ये पॉलिसीधारकांना मिळणार मालक होण्याची संधी !
- माजी आ.हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग, गुन्हा दाखल
- एल्गार परिषदेत गरळ ओकणारा शरजील उस्मानी नक्की आहे तरी कोण ?
- भाजपच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरूच; ‘उद्धव ठाकरे आपडा’नंतर ‘रासगरबा’
- धोनीच्या शेतातील भाजी विकणारी गोंडस भाजीवाली झीवा ! पहा व्हिडीओ…


