🕒 1 min read
मुंबई : राज्यावर कोरोनाचे सावट असल्याने यंदा सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काल राज्यात उत्साहाच्या वातावरणात व निर्बंधांचे पालन करून घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले. संकटनाशक, विघ्नहर्ता अशी ख्याती असलेले श्री गणेश प्रत्येकासाठी आनंद घेऊन येण्यासह अडथळे दूर करतात अशी ख्याती आहे. त्यामुळेच संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट राज्यासह देशावरून दूर होऊन सर्व काही सामान्य व्हावं अशी प्रार्थना बाप्पा चरणी केली जात आहे.
दरम्यान, बाप्पा काल विराजमान झाल्यानंतर आज पासून गणेश विसर्जन सुरु झाले आहे. दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला जात असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने विसर्जनासाठी खास गाईडलाईन जारी केल्या आहेत. रात्री ८ च्या आत विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. यासोबतच, विसर्जन स्थळी केवळ चार भक्तांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचं पालिकेने जाहीर केलं आहे.
काय आहेत मार्गदर्शक सूचना ?
- आजपासून सुरू होणाऱ्या विसर्जनासाठी महापालिकेने 9 प्रभागात एकूण 44 तलाव निश्चित केले आहेत. याच तलावावर शासनाचे नियम पाळून गणरायाचे विसर्जन करायचे आहे.
- विसर्जनाच्या वेळी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गणेशभक्तांनी आपल्या मंडळात किंवा घरीच आरती घेऊन, विसर्जन स्थळावर जायचे आहे. मूर्तीसोबत फक्त 4 गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार आहे.
- रात्री ८ वाजेपर्यंतच विसर्जन करणे सर्वांवर बंधनकारक आहे.
- वसई-विरार, नालासोपारा परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी 450 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 750 पोलीस कर्मचारी तैनात असणार आहेत.
- तसेच वाहतूक शाखा, होमगार्ड, दंगलनियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलही तैनात असणार आहेत.
- विसर्जन तलाव, मोक्याचे नाके, वाहतूक कोंडी होणारे परिसर, तसेच नाकाबंदी करण्यासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा असणार आहे.
- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी शासनाचे सर्व नियम पाळून आजचे विसर्जन आणि पुढील बाप्पाचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’
- आरोपींवर कडक कारवाई होईलच, पण वयात येतानाच मुलांवर संस्कार करणं गरजेचं- रुपाली चाकणकर
- नवीन नेतृत्त्वाला संधी देणं ही भाजपची परंपरा, मी राजीखुशीनं राजीनामा दिला आहे – रुपाणी
- ‘दरवेळेस आमच्याकडे बोट दाखवण्यापूर्वी कधी तरी हळहळ व्यक्त करा’, भाजपचा राऊतांवर हल्लाबोल
- विघ्नहर्ता पावला : ‘या’ ८ जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही !


