मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकारामुळे राज्य नव्हे तर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात घडलेल्या या घटनेमुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.
मात्र, यावरून शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे. ‘हा कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न आहे. पण या सगळ्या विषयाचं राजकारण करु नये. गोंधळ उडवून सरकारवर चिकलफेक करण्याचं राजकारण करु नये. कारण अशा प्रकारच्या घटना या राज्याला मान खाली घालायला लावतात. महिलेचा जबाब पोलिसांना नोंदवता आला असता तर अनेक गोष्टी बाहेर आल्या असत्या तरीही पोलिसांनी मुख्य आरोपीला पकडलं आहे’ असे संजय राऊत म्हणाले.
राऊत यांच्या या वक्तव्य्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी समाचार घेतला आहे. ‘कांगावा करणे, मृतांच्या डोक्यावरचं लोणी खाणे अशा बेशरमपणाचा एकाधिकार तुर्तात ठाकरे सरकार आणि विशेषतः शिवसेनेकडे आहे. प्रत्येक वेळा भाजपाकडे बोट दाखवण्याआधी कधी तरी झाल्या प्रकाराबाबत हळहळ तर व्यक्त करा’ असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
संजय राऊत यांच्याकडून विश्वास
‘यासंदर्भात विरोधी पक्ष सरकारवर आरोप करत आहे. त्यांनी भूमिका मांडली पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. या प्रकरणातील आरोपीला जी कठोर शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे. फास्ट ट्रॅकपद्धतीने हा खटला चालला पाहिजे. या घटनेची तुलना दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाशी केली जात आहे. तुलना करायला हरकत नाही, शेवटी एका महिलेने आपला जीव यात गमावला आहे. यासारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारला अधिक कठोर पावलं उचलावी लागतील आणि ती उचलल्याशिवाय राहणार नाही’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप
एका बाजूला कोविडचे निर्बंध आहेत, तर दुसरीकडे अशा घटना घडत आहेत. पोलीस काय करत आहेत? असा संतप्त सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अशा घटनांमध्ये सहभाग दिसतोय. तर इथे सरकार असल्यामुळे पोलिसांवर दबाव आणला जातोय. कमी कलमं लावली जात आहेत. राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. पटापट जामीन होत आहे, असा आरोप करतानाच देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायद्याचा धाक निर्माण झाला होता. पण आता पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर काय होणार, अशी खोचक टिप्पणीही पाटील यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, त्यांना खाली पाहावं लागलं, याचं दुःख होतं – भुजबळ
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- आरोपीच्या शिक्षेसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री लवकरात लवकर पाऊल उचलतील याचा विश्वास – राऊत
- उजळ माथ्याने मेळावे घेणाऱ्या महेबूब शेखवरही गुन्हा दाखल करा, भाजप महिला मोर्चाची मागणी
- ‘कॅंण्डल मार्चवाले आता आवाज का उठवत नाही?’; ‘साकीनाका घटनेवर वेलणकरचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

