🕒 1 min read
मुंबई : साकीनाका येथे एका घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने पीडित महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेवर राज्यभारातून संतापाची लाट उसळली आहे. या आरोपींना तात्काळ फाशीच्या शिक्षेची मागणी केली जात आहे. महाविकास आघाडीवर विरोधक टीका करत आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीकडून आरोपींवर कडक कारवाई करु, असं सागितलं जात आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आता याबाबत वेगळीच शंका व्यक्त केली आहे.
साकीनाकामधील घटना निंदणीय, संतापजनक आहे. आपण नेहमी निर्भया झाल्यानंतरच आपण चर्चा करणार आहोत का? त्यानंतर कँडल मार्च, निषेध नोंंदवणार आहे का? अशा घटना घडल्यानंतर 4-5 दिवस चर्चा करतो आणि विसरुन जातो. पुढे अशा घटना घडू नये म्हणून चर्चा करतो. मात्र ठामपणे भूमिका घेणं गरजेचे आहे. कायदे आहेत, कायद्याचं राज्य आहे. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करत आहे. पण घरातील संस्कार महत्वाचे झाले आहेत. आज नाती विसरुन बाप मुलीवर, भाऊ बहिणीवर बलात्कार करतो. वयात येणाऱ्या मुलांवर संस्कार करणं महत्वाचं आहे, असं मत रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे.
आमच्या खासदारांनी केंद्राला अनेकदा पत्र पाठवली आहेत की, पोर्नोग्राफी वेबसीरीज वाढलेत त्याला कुठे तरी आळा घालावा. वयात येणारी मुलं, समाजातील जनमाणस आजबाजूला घडणाऱ्या घटना पाहतात त्याचं अनुकरण करायला जातात. ही वाढती विकती बंद झाली पाहीजे. शालेय जीवनात लैंगिक शिक्षणाचा प्रभावी वापर करुन वयात येणाऱ्या मुलांवर संस्कार करण्याची गरज आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
वाढलेली विकृती आणि माणसांच्या कळपात वावरणाऱ्या हिंस्त्र श्वापदांचा खऱ्या अर्थाने अंत करायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येत समाजात कार्यक्रम राबवणं आणि वयात येणाऱ्या मुलांना संस्कार देणं फार गरजेचं झालं आहे, असंही चाकणकर म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, त्यांना खाली पाहावं लागलं, याचं दुःख होतं – भुजबळ
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- आरोपीच्या शिक्षेसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री लवकरात लवकर पाऊल उचलतील याचा विश्वास – राऊत
- उजळ माथ्याने मेळावे घेणाऱ्या महेबूब शेखवरही गुन्हा दाखल करा, भाजप महिला मोर्चाची मागणी
- ‘कॅंण्डल मार्चवाले आता आवाज का उठवत नाही?’; ‘साकीनाका घटनेवर वेलणकरचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
