Share

‘फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’

Published On: 

मुंबई : मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची आज मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. साकीनाक्यामध्ये शुक्रवारी झालेल्या या अत्याचार प्रकरणात मोहन चौहान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने पीडित महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला होता. अत्याचार केल्यानंतर या नराधमाने पीडितेवर चाकूने वार देखील केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पीडितेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

या प्रकारामुळे राज्य नव्हे तर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्यात घडलेल्या या घटनेमुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा भडिमार सुरू केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर बोलताना एकाही आरोपीला सोडणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा सकाळीच केली नाही.

राज्यातील दिग्गज नेते या घटनेचा निषेध करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अद्याप या प्रकरणावर काहीच भाष्य केलेले नाहीये. त्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या घटनेवर अप्रत्यक्षपणे बोलत शरद पवारांना टोला लगावला आहे. ‘इकड तिकडच्या फुटकळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणारे जाणते शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?’ असा खोचक सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकरणांना वेळीच आळा घालण्यासाठी व आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅक चालवला जाईल,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!