Share

नवीन नेतृत्त्वाला संधी देणं ही भाजपची परंपरा, मी राजीखुशीनं राजीनामा दिला आहे – रुपाणी

Published On: 

अहमदाबाद – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या राजीनाम्याची विरोधकांनाच नव्हे तर पक्षातील नेत्यांना देखील सुद्धा कल्पना नव्हती असे सांगितले जात आहे.

राजीनामा दिल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रुपाणी म्हणाले, मी राजीखुशीनं राजीनामा दिला आहे, कुणाचाही माझ्या दबाव नाही. मला संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. तसेच माझ्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानतो, पक्ष जी जबाबदारी सोपवेल ती मी पार पाडणार आहे.

जेपी नड्डा यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी देखील अभूतपूर्व आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राज्य निवडणुका लढतो आणि 2022 च्या निवडणुकाही त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जाणार आहे.गुजरातला आता नवं नेतृत्त्व मिळेल. नवीन नेतृत्त्वाला संधी देणं ही भाजपची परंपरा आहे. पदाचा राजीनामा देऊन संघटनेसाठी काम करण्याची इच्छा आहे, असं देखील रूपाणी या वेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!