Share

सततच्या पर्जन्यमानाने घरांचे, पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- आमदार संभाजी पाटील

Published On: 

🕒 1 min read

लातूर : यंदा मान्सून चांगला बरसला असला तरी सततच्या पर्जन्यमानामुळे गावांतीत घरांचे आणि शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे. या संदर्भात आमदार पाटील यांनी लातूर जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्रही पाठवले आहे. या पत्रात त्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

या पत्रामध्ये आमदार संभाजी पाटील यांनी लिहिले की, ‘लातूर जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली आहे. विशेषत: मंगळवारी सात सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सतत मुसळधार पाऊस पडत होता. त्याच बरोबर या पावसाने नदीकाठच्या गावांमध्ये नदीला पुर आल्याकारणाने गावातील गोर-गरीबांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांची पडझड तसेस शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची तात्काळ दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने पिक व नदीकाठच्या गाव नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा.’

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त भाग असला तरी यंदा चांगला पाऊस झाला आहे. मात्र, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या विषयी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सतर्क राहण्याचे आणि नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!