Share

 ‘मेड फॉर इच अदर’ कपल म्हणत हेमंत ढोमे, क्षितीला चाहत्यांची पसंती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : छोटा पडदा असो किंवा मोठा पडद्यावरील असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच कलाकाराची एक जोडी म्हणजे अभिनेता हेमंत ढोमे आणि अभिनेत्री क्षिती जोग. दोघेही एकमेकांसाह फोटो शेअर करत कपल गोल देत असतात. त्यांच्या चाहत्यांनाही या कपलचे फोटो प्रचंड पसंतीस पडतात.

मराठीतील एक क्युट कपल म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. २०१२ साली दोघांनीही लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. क्षिती जोग मराठी प्रमाणे हिंदी मालिका विश्वातही तितकीच प्रसिद्ध आहे. ती अभिनेते अनंत जोग, उज्वला जोग यांची मुलगी आहे. आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्षितीनेही अभिनय क्षेत्रात एंट्री करत स्वतःला सिद्ध केले आहे. क्षिती जोग ‘दामिनी’ या मालिकेतून सर्वपरिचित झाली. ‘तू तिथे मी’,’गंध फुलांचा गेला सांगून’ मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही मनोरंजन केले आहे. ‘घर की लक्ष्मी बेटिया’,’साराभाई vs साराभाई’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतही क्षिती झळकली होती. तर हेमंत ढोमेसुद्धा मराठी इंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा सिनेमाच येत्या १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात क्षितीचीही भूमिका आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोघांनीही एकत्र काम केले आहे. क्षिती या सिनेमाची निर्मातीदेखील आहे.

हेमंत आणि क्षिती दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात.दोघेही एकमेकांची काळजी घेतात. दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून मेड फॉर इच अदर कपल असं ही चाहत्यांनाकडून त्यांना कमेंट येत असतात.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!