मुंबई : राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एकदा टिकास्त्रांचा वर्षाव करत आरोप केले आहेत. तसेच ‘तुला तुरुंगात टाकल्याशिवाय शांत राहणार नाही’, असे वक्तव्य देखील मलिक यांनी केले होते. यावरून सध्या एकच खळबळ उडाली आहे. त्याबाबतच आता मंत्री नवाब मलिक यांच्या मोबाइलवर धमकीचा फोन आल्याची माहिती आहे.
मंत्री नवाब मलिक यांच्या मोबाइलवर आज धमकीचा फोन आला. मात्र त्यांचा फोन पोलिसाकडेच होता. त्यावेळी पोलिसाने फोन उचला असता ‘वानखेडजी अच्छा काम कर रहे हैं, आप एनसीबी का पिछा छोड दो’, अशी धमकी फोनवरील व्यक्तीने दिली आहे. या प्रकरणी सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र याप्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी अद्याप कुठलीही तक्रार केली नाही.
गुरुवारी बोलत असतांना मलिक म्हणाले,’एनसीबी करत असलेल्या कारवाईची प्रकरणं बोगस आहेत, त्यांना आपण लवकरच एक्सपोज करू. वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल. तसेच नवाब मलिकच्या जावयाला तुरुंगात टाकताना वरून दबाव टाकणारा तुझा बाप कोण? तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी शांत राहणार नाही’, असे ते म्हणाले होते. सध्या हे प्रकरण अधिकच पेटत असून आरोप- प्रत्यारोप सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान मलिक यांना आलेला हा धमकीचा फोन राजस्स्थानमधून आल्याचे सांगितले जात आहे. तर याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रस्तरीय स्थायी मंत्रीगटाची अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठक
- राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला-धनंजय मुंडे
- ‘तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें’, भाजपचा पलटवार
- लालबागेतील आगीला व्यवस्थापन जबाबदार, महापौर किशोरी पेडणेकर
- ‘तुमचंच सुरू ठेवायचं असेल तर ठेवा, मी निघून जातो’, अजित पवार पत्रकारांवर संतापले


