Share

मोठी बातमी : सचिन वाझे पाठोपाठ सहकारी रियाझुद्दीन काझीही निलंबित

Published On: 

मुंबई – निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी यांना, निलंबित करण्यात आलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए नं काझी यांना अटक केल्यानंतर, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. उद्योजक मुकेश अंबानी सुरक्षा प्रकरणी, वाझे यांना अटक केल्यानंतर आतापर्यंत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.

काझी हा २०१० च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहे. त्यांची पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस ठाणे येथे करण्यात आली होती.पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाल्यानंतर काझीची सीआययू पथकात नियुक्ती करण्यात आली. ९ जूनला सचिन वाझेने सीआययु पथकाचे प्रभारी म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून काझी हा वाझेसोबत काम करीत होता. त्याच्या जवळचा साथीदार म्हणून त्याची ओळख हाेती.

दरम्यान,सचिन वाझेच्या अटकेनंतर रियाजुद्दीन काझी एनआयएच्या रडारवर आला होता. सचिन वाझे याचा सहकारी एपीआय रियाजुद्दीन काझी यांना एनआयएने कटात सामील असल्यामुळे आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्वाची भूमिका बजावल्यामुळे अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान,सुरुवातीला एनआयए कोर्टाने वाझे याला एनआयए कोठडी सुनावली होती. ही कोठडी नुकतीच संपली असून एनआयए कोर्टाने सचिन वाझेला आता न्यायालयीन कोठडीत पाठविले आले आहे. कोर्टाने त्यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाझेच्या वकिलांनी सुरुवातीला एनआयए कोठडीला विरोध केला होता.

दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वाझेंच्या वकिलाने वाझेंसाठी कोर्टाकडे तुरुंगात सुरक्षित सेल देण्याची मागणी केली आहे. सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीने हा सेल देण्यात यावा अशी मागणी वकिलांनी केली असून वाझेची रवानगी आता तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!