Share

बाबा रामदेव यांच्यावर कारवाईसाठी ‘IMA’ चे पंतप्रधान मोदींना पत्र

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हं नाहीत. कारण बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वादा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. ‘आयएमए’कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीण्यात आलं असून यात बाबा रामदेव यांनी एलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय बाबा रामदेव यांच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

‘रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. एका व्हिडिओत त्यांनी १० हजार डॉक्टर आणि १ लाख लोकं करोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन मृत पावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा”, अशी मागणी आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेत देशात ७५३ तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ५१३ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. बाबा रामदेव यांनी एलोपॅथीला मुर्ख विज्ञान ठरवून डॉक्टरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका आयएमएनं घेतली आहे.

एक हजार कोटींची नोटीस

त्यापूर्वी उत्तराखंड ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’नं योगगुरू बाबा रामदेव यांना तब्बल १ हजार कोटींची मानहानीची नोटीस धाडलीय. येत्या १५ दिवसांत योगगुरु रामदेव यांनी लेखी माफी मागवी तसंच व्हायरल झालेल्या वक्तव्यांबद्दल प्रतिवाद करणारा व्हिडिओ पोस्ट करावा, अशी मागणी आयएमएकडून करण्यात आलीय. रामदेव यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर १००० कोटींचा दावा दाखल केला जाईल, असे सांगण्यात आलेय.

यामुळे सुरू झाला वाद
योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत करोनाच्या मृत्यूमागे एलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर एलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे करोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांच्या वक्तव्याप्रकरणी संताप व्यक्त करत विधान मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर योगगुरु रामदेव यांनी विधान मागे घेतलं होतं. मात्र वाद शमण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!