पैठण: हिरडपुरी नदीपात्रात पोलीस प्रशासन, महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तसेच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. गोदावरी नदीच्या पाञात वाळू माफियांनी गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. रात्री बेकायदेशीरपणे जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून साठे करून ही वाळू हायवा मध्ये भरली जात आहे. हा सर्व प्रकार येथील मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील तसेच गावाचे सरपंच यांना माहीत असूनही ते याकडे दुर्लक्ष करत आहेत.
फेब्रुवारी महिन्यात हिरड पुरी येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा बाबत नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधून या अवैध वाळू उपसाची माहिती दिली होती. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी तत्काळ या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी अनमोल सागर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गोरक्षनाथ भामरे यांनी धडाकेबाज कारवाई करून सुमारे पावणे पाच लाखाचे वाळू साठे जप्त केले होते. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले होते. परंतु प्रशिषणार्थी उप विभागीय अधिकारी अनमोल सागर यांचा कालावधी संपताच पुन्हा हिरडपुरी वाळू पट्ट्यात वाळू माफिया सक्रिय झाले आहेत.
लिलाव गेवराई तालुक्यात उपसा पैठण तालुक्यात
पैठण तालुक्यातील एकाही वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नाही. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गुळज या वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला आहे. याचा फायदा घेऊन पैठण तालुक्यातील वाळू माफियांनी हिरडपुरी येथील गोदावरी नदीच्या पात्रात रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू केला.
गेवराई तालुक्यात वाळू वाहतूक करण्यासाठी हिरडपुरी येथील गोदावरी नदीच्या पात्रात बांध घालून रात्रभर अवैध वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. तसेच विहामांडवा,डोणगाव थेरगाव, नारायणगाव, पैठण एमआयडिसी, नानेगाव, बालानगर, कचनेर या मार्गाने औरंगाबाद, बिडकिन परिसरात सुरू असलेल्या नवीन औद्योगिक वसाहतीमध्ये तसेच बीड, अहदनगर येथे ही वाळू विक्री करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- व्हाइस प्राइसच्या ज्युरी; आशिया खंडातील पहिल्या महिला पद्मश्री फातिमा झकेरिया यांचे निधन
- देवेंद्र फडणवीस एका चेंडूत चार विकेट काढणार ; भाजप नेत्याचा दावा
- बच्चू कडूंचा रौद्रावतार; रुग्णालय मेसमधील स्वयंपाकीच्या लगावली कानशिलात !
- अवैध वाळू उपसा करणारे 2 पोकलेन, एक जेसीबीसह 5 टिप्पर, 7 ट्रॅक्टर जप्त
- औरंगाबादेत व्यापारी वर्गाला सूट द्या! भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

