सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील अवैध वाळू उपसा व मटका, गुटखा, पत्ते, ऑनलाईन लॉटरी अशा अवैध धंद्यांना स्थानिक पोलिसांकडून अभय मिळत आहे. हे अवैध धंदे तात्काळ बंद करावे यासाठ शिवसेनेचे तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे यांनी पोलिस व संबंधित यंत्रणेकडे कारवाईची मागणी केली. तरीही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने रघुनाथ वाघमोडे यांनी बुधवारी (दि.२४) थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सिल्लोड तालुक्यातील खोडकाई वाडी, केराळा, भवन, उपळी, बोरगाव बाजार, बहुली, अन्वी, मोढा, सीसारखेडा, डोंगरगाव आदी ठिकाणच्या वाळूपट्टा मधुन दिवस-रात्र जेसीबीच्या सहाय्याने हायवा, टिप्पर व ट्रॅक्टर मधून बेसुमार वाळू उपसा सुरू असल्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या वाळू माफियांनी तालुक्यातील नद्यांचे अक्षरक्षः लचके तोडले असल्यामुळे येणाऱ्या काळात सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचे संकट भेडसावणार आहे.
सिल्लोड तालुक्यात सुरू असलेल्या या अवैध वाळू उपशासह सह तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी वेळीच कारवाई करावी म्हणून शिवसेनेचे शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, माजी नगरसेवक सुदर्शन अग्रवाल यांनी मागील दोन महिन्यांपासून पोलिस व संबंधित विभागाकडे अनेक वेळा निवेदन देऊन देखील स्थानिक पोलिस प्रशासन व महसूल प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे तालुक्यातील या अवैध व्यवसायाला दिवसेंदिवस आणखीनच बळकटी मिळत असल्याचे दिसून येते
महसूल व पोलिस प्रशासन यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात आरोप होत असल्याने शिवसेना शहर प्रमुख रघुनाथ घरमोडे यांनी या धंद्यांना वेळीच आवर घालावा म्हणून याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात केली आहे. परंतु या निवेदनाची संबंधितांनी अद्याप पर्यंत ही दखल न घेतल्यामुळे शेवटी घरमोडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्याकडे तक्रार पाठवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात कडक संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद
- खाजगीत जाण्याची ऐपत नाही, सरकारी रुग्णालय भरती करून घेईना! पॉझिटिव्ह रुग्णाची आपबिती
- जालना जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर, चोवीस तासांत आठ बळी!
- तर… औरंगाबादेत काही तासामध्ये लागणार लॉकडाऊन ?
- उस्मानाबादेतील कोरोना केंद्राची तपासणी करण्याचे आदेश


