Share

उस्मानाबादेतील कोरोना केंद्राची तपासणी करण्याचे आदेश

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या या फैलावाला नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील कोरोना केंद्रांची तपासणी होणार असून त्यासाठी आठ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कोव्हीड केअर सेंटरची तपासणी तसेच सुविधा व तेथील कामे सुरळीत व्हावीत यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने आठ तपासणी पथके तयार केले आहेत. समितीचे अध्यक्ष तसेच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक नेमून तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना केंद्राच्या चौकशी फॉर्मेट नुसार आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी तपासणी करून त्याबाबातचा अहवाल सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करायचा आहे. कोव्हीड केअर सेंटर मधील सोयी-सुविधा संबंधित काही गंभीर प्रश्न असतील तर तत्काळ कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावेत असे आदेशही तपासणी पथकाला देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!