Share

बीड जिल्ह्यात कडक संचारबंदी, जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

Published On: 

बीड : राज्यात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. कोरोना रुग्ण संख्येत सुद्धा झपाट्याने वाढ होत असून कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी शासन तसेच प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तरी याचा म्हणावा तेवढा उपयोग होतांना दिसत नाहीये, कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक जिल्ह्यांमध्ये संचार बंदी तसेच पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जगताप यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केला असून येत्या २६ मार्च २०२१ ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी व संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. दहा दिवसांच्या या काळात सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व सीमा सिल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. यात न्यायिक आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह मुभा देण्यात आलेल्या काहींना वगळण्यात आले आहे.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे तसेच या आदेशांचे पालन न करणारी, उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर साथरोग प्रतिबंध कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ भादंवि १८६० नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!