मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस जनजीवन सुरळीत होत असतानाच यावर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातला आहे. देशातील अनेक भागांमध्ये स्थिती गंभीर झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बरेच क्रिकेटपटू मदतीसाठी समोर आले आहेत. त्यातच भारताचा फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलनेही क्रायडफंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे बंगळुरुच्या एका रुग्णाला आर्थिक मदत केली.
चहलने या रुग्णाला मदत करण्यासाठी २ लाख रुपयांची मदत केली आहे. बंगळुरूच्या एका रूग्णाने या निधीसाठी चार लाख रुपयांचे लक्ष्य ठेवले होते, त्यापैकी चहलने अर्धी देणगी दिली आहे. या रुग्णाच्या एका ओळखीच्या एका सदस्याने लिहिले की करोनाशी लढणाऱ्या त्याच्या मित्राच्या कुटूंबातील अमूधा या सदस्याला हा निधी दिला जात आहे. बंगळुरूच्या सेंट जॉन मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये हा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. उपचाराचा खर्च भागविण्यासाठी कुटुंबाने जे काही करता येईल ते केले, परंतु अद्याप ४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यानंतचर चहलने ही मदत केली.
दरम्यान, युझवेंद्र चहलने विरुष्काच्या उपक्रमाला 95 हजार रुपयांची देणगी दिली, पण यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. क्रिकेटपटू म्हणून तू कोट्यवधींची कमाई करता, पण मदत मात्र एवढी कमी, असं चहलला सोशल मीडियावर ऐकवण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- गंगेत तरंगणारे मृतदेह नाजयेरियाचे आहेत : कंगना रनौत
- पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचा हाहाकार; १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर
- तेलगाव कोविड केअर सेंटरचे काम अपूर्णच; महिना उलटला तरी कासव गतीने काम
- सलमानचा ‘राधे’ला आयएमडीबी वर मिळाली ‘एवढी’ रेटिंग
- कोरोनावर मात करणाऱ्या राजीव सातवांची तब्बेत पुन्हा खालावली…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

