Share

‘फ्रेंडस’च्या चाहत्यासाठी मोठी बातमी; १७ वर्षानंतर ते पुन्हा चाहत्यांच्या भेटीला

Published On: 

मुंबई : दुरचित्रवाणी क्षेत्रातील प्रसिद्ध मालिका ‘फ्रेंडस’च्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ९०च्या दशकातील या मालिकेने लोकप्रीयतेचे शिखर गाठले होते. आता हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २७ मे रोजी हा शो एचबीओ मॅक्सवर प्रदर्शित होत आहे.

सहा मित्रांची जिवनगाथा, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी दर्शवणाऱ्या या मालिकेने खुप लोकप्रियता मिळवलेली आहे. लोकप्रियतेचे अनेक विक्रम या मालिकेने मोडीत काढले होते. आता तब्बल १७ वर्षानंतर हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फ्रेंडस: द रीयूनियन’ असे या शोचे नाव असणार आहे. येत्या २७ मे रोजी हा शो एचबीओ मॅक्सवर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत सहा मित्रांची भूमिका ही जेनिफर एनिस्टन, कोर्टनी कॉक्स, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक, मॅथ्यू पेरी आणि डेव्हिड श्विमर या सहा कलाकारांनी साकारली होती.

२२ सप्टेंबर रोजी १९९४ साली या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. यानंतर तब्बल दहा वर्षापर्यंत या मालिकेची मोहिनी रसिकांवर होती. जगभरात या मालिकेचे चाहते आहेत. ६ मे २००४ साली या मालिकेचा आखेरचा भाग प्रदर्शित झाला होता. ‘एचबीओ मॅक्स’ला वर्षपुर्ती झाल्याच्या पार्श्वभूमिवर ही मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २७ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेत अनेक दिग्गज पाहुण्या भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!