🕒 1 min read
नवी दिल्ली: संसदेत सुरु असलेल्या अधिवेशना दरम्यान लोकसभेत जम्मू-कश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक-2021 मंजूर करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांवर सडकावून टीका केली, पिढय़ान्पिढय़ा तुम्ही सत्तेत होता आणि आता आमच्याकडे कसला हिशोब मागता? जम्मू-कश्मीरातून कलम 370 हटवून केवळ 17 महिने झाले आहेत. 70 वर्षे तुम्ही योग्य रीतीने कारभार केला असता तर आमच्याकडे हिशेब मागण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली.
यावेळी शहा यांनी कलम 370 हटविल्यानंतर जम्मू-कश्मीर या केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणाऱया योजनांची माहिती दिली. जम्मू-कश्मीरमध्ये आतापर्यंत केवळ तीन कुटुंबांचे शासन होते. त्यामुळे कलम 370 हटविल्याचा त्रास या तीन कुटुंबियांनाच होत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये यापुढे जनता शासन निवडेल. त्यासाठी कोणत्या राजा आणि राणीच्या घरात जन्म घ्यायची गरज नाही. जनताच आपला प्रतिनिधी निवडेल.
शाळा जाळल्या नसत्या तर कश्मिरी तरुण आयएएस आणि आयपीएस अधिकारी झाले असते. कलम 370 हटवून केवळ 17 महिने झालेत आणि आमच्याकडे हिशेब मागितला जात आहे. जे पिढय़ान्पिढय़ा सत्तेत होते त्यांनी आधी हिशेब द्यावा. आमच्याकडे कसला हिशेब मागता? 70 वर्षे ज्यांनी राज्य केले त्यांनी स्वतःकडे पाहावे आणि ठरवावे की, आपण खरंच हिशेब मागण्याच्या लायक आहोत का? आज लोकसभेत मंजूर झालेले जम्मू-कश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक आणि राज्याचा दर्जा याचा काहीही संबंध नाही. योग्य वेळी जम्मू-कश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबत सरकार निर्णय घेईल असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अहिल्यादेवींचा इतका आदर वाटतो तर पवारांनी धनगर समाजाला आरक्षण का दिले नाही?’
- ‘या’ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत घोटाळा, ग्राहकांचे तब्बल दीड कोटी लाटले…
- १५०० स्वेअर फूटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- शिंदे
- औरंगाबादचे नामकरण लवकरच संभाजीनगर, एकनाथ शिंदेंची माहिती
- “गोध्राकांड आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
