Share

‘आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होता कामा नये’

Published On: 

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. परंतु रविवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आपली जीवनज्योत विझवली. ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं ? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आहे. या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

या प्रकरणाशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाल्या असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हटलं की, ‘पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्रीजी एवढे पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय’, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व घटनाक्रमावर भाष्य केले आहे. ‘या प्रकरणी व्यवस्थित चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई होईल’, असं त्यांनी सांगितलं आहे.

‘गेले काही दिवस काही महिने काही वेळेला आपलं असं लक्षात आलेलं आहे. आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न हा केला जातोय. तर असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामा नये. सत्य लपवण्याचा प्रयत्न होणार नाही. जे काही सत्य असेल ते पूर्ण चौकशीतून जनतेसमोर येईल’, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!