Share

कोव्हीडचा प्रादुर्भाव असेपर्यंत ऑनलाइन परीक्षेचा पर्याय उपलब्ध

Published On: 

नांदेड : कोरोना प्रादूर्भाव असेपर्यंत ऑनलाइन परीक्षेचा पर्याय उपलब्ध असेल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी ऑफलाइन परीक्षा देण्याची सोय करता येईल. असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शनिवारी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कोरोना प्रादुर्भावामुळे मागील शैक्षणीक सत्रात विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. पण काही कालावधीनंतर फक्त अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. ऑनलाइन परीक्षेच्या वेळी अनेक तांत्रिक अडचणीमुळे गैरसोय झाल्याने ऑफलाइन परीक्षेचाही पर्याय उपलब्ध करण्यात आला होता. कोरोना प्रादुर्भाव अजुनही संपुर्णपणे नाहीस झाला नाही, त्यामुळे कोरोना संपेपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार परीक्षा देऊ शकतील, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शनिवारी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय अॅट नांदेड या उपक्रमासाठी सामंत येथे आले होते. यावेळी सांमत यांनी नांदेडसह मुंबई, नागपूर, अमरावती, पुणे, औरंगाबाद येथील विद्यापीठांमध्ये प्रबोधनकार अभ्यास केंद्र सुरू करण्यासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा केली. तसेच प्राचार्य भरतीविषयी मोठे भाष्य करताना सामंत म्हणाले की, राज्यात २६९ प्राचार्यांच्या भरतीचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया लवकरच पुर्ण होऊन आणि या बरोबर विद्यपीठांमधील ४८ संवैधानिक पदेही भरण्यात येणार आहे. असे सामंत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!