नवी दिल्ली: भाजपकडून नेहमीच गांधी परिवारावर टीका केली जाते तर अनेक गोष्टींसाठी युपीए सरकारला जबाबदार ठरवले जाते. नुकतेच संसदेतील अधिवेशनामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षासह विरोधी पक्षांवर सडकावून टीका केली, पिढय़ान्पिढय़ा तुम्ही सत्तेत होता आणि आता आमच्याकडे कसला हिशोब मागता ?’
यावर भाजपला प्रतिउत्तर देताना राहुल गांधीनी अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील प्रोफेसर दीपेश चक्रवर्ती यांच्याशी डिजिटल संवाद साधताना भाजपवर पलटवार केला. त्यांनी सांगितले की, ‘आमच्या कुटुंबातील शेवटचा पंतप्रधान 30-35 वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर कुटुंबातील कोणीही व्यक्ती पंतप्रधान झालेली नाही. यूपीए सरकारमध्ये कोणी मंत्री नव्हते,’
पुढे आणखी स्पष्टीकरण देताना त्यांनी ‘माझे वडील राजीव गांधी 1984-89 या काळात पंतप्रधान होते. कुटुंबातील ते शेवटचे पंतप्रधान होते. 30-35 वर्षे झाली त्यानंतर गांधी कुटुंबातील कोणीही पंतप्रधान झालेला नाही. यूपीए सरकारच्या कार्यकाळातही आमच्या कुटुंबातील कोणीही मंत्री नव्हते. मी मूल्यांवर आधारीत राजकारण करतो. माझ्या काही कल्पना आहेत. मूल्यांसाठी मी लढत राहणार.
यावेळी त्यांनी कृषी कायद्यांवरून भाजपवर टीका केली. ‘कृषी क्षेत्रात सुधारणा हव्यात पण कृषी क्षेत्रच उद्ध्वस्त करणाऱया या सुधारणा नकोत. त्यामुळे मोदी सरकारला कायदे मागे घ्यावेच लागतील. काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी मोदी सरकारने सुधारित कृषी कायदे केले आहेत,’ असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
“गोध्राकांड आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले”
कोव्हीडचा प्रादुर्भाव असेपर्यंत ऑनलाइन परीक्षेचा पर्याय उपलब्ध
- जालना-बदनापूर मार्गावर अपघातात ट्रॅक्टरचालक जागीच गतप्राण
- ‘पिढ्यानपिढ्या तुम्ही सत्तेत; आमच्याकडे कसले हिशेब मागता ?’ शहांची काँग्रेससह विरोधकांवर टीका !


